American Soldier : रशियासाठी लढणाऱ्या अमेरिकन सैनिकाला पदक; गतवर्षी युक्रेनमध्ये हत्या; आई अमेरिकन गुप्तचर संस्था CIAची उपसंचालक
युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाकडून लढणाऱ्या एका अमेरिकन सैनिकाला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मरणोत्तर ऑर्डर ऑफ लेनिन पदक प्रदान केले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, या अमेरिकन तरुणाचे नाव मायकेल ग्लॉस (२१) होते. गेल्या वर्षी युक्रेनमध्ये रशियाकडून लढताना तो शहीद झाला होता.