Understand Geo politics : अमेरिकन प्रेसने पसरविले भारत विरोधी narrative; पण प्रत्यक्षात भारताचे पाकिस्तान वरले हल्ले अचूक आणि assertive!!
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली??, ती कुणी केली??, याच्या बातम्या देताना अमेरिकन प्रेस विशेषत: न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN यांनी भारत विरोधी नॅरेटिव्ह पसरवले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुबॉम्बचे युद्ध भडकण्याची शक्यता किंबहुना “गुप्त माहिती” अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. पाकिस्तानी लष्करामधल्या कट्टरतावादी शक्ती एकतर भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरतील किंवा पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडतील, असे जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याच्या बातम्या CNN आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी गुप्ताचरांच्या हवाल्याने दिल्या. यातून भारत घाबरल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे नेहमीप्रमाणे सूचित केले. पण पाकिस्तानशी फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताला परत करण्याविषयी बोला, असे मोदींनी जे. डी. व्हान्स यांना सुनावले, याची बातमी मात्र न्यूयॉर्क टाइम्स किंवा CNN यांनी चालविली नाही.