Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- अमेरिकन कंपन्यांनी भारतीयांची भरती थांबवावी; आधी अमेरिकन लोकांना नोकऱ्या द्या!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांना भारतीयांची भरती थांबवण्यास सांगितले आहे.काल वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या एआय समिटमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेक कंपन्या आपल्या स्वातंत्र्याचा फायदा घेतात, परंतु चीनमध्ये कारखाने उभारतात आणि भारतातील लोकांना कामावर ठेवतात.