America to India : अमेरिकेत कमावलेले पैसे भारतात पाठवण्यावर 3.5% कर; यातून अमेरिकेला तब्बल ₹8हजार कोटी मिळणार
अमेरिकेत कमावलेले पैसे भारतात पाठवण्यावर ३.५% कर लागेल. यापूर्वी ५% कर प्रस्तावित होता. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाने २२ मे रोजी ‘वन बिग, ब्युटीफुल बिल ॲक्ट’ मंजूर केला. या विधेयकात अमेरिकेत परदेशी कामगारांनी कमावलेले पैसे त्यांच्या देशात पाठवण्यावर कर लावण्याची तरतूद आहे.