West Bengal : पश्चिम बंगालमधील विद्यापीठांमध्ये राज्यपालच असतील कुलपती; राष्ट्रपतींनी सुधारणा विधेयकांना मंजुरी दिली नाही
पश्चिम बंगालमधील राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या विद्यापीठांमधील प्रशासकीय बदलांबाबतचा वाद अधिकच वाढला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्या सुधारणा विधेयकांना मंजुरी देण्यास नकार दिला आहे, ज्या अंतर्गत राज्यातील विद्यापीठांमध्ये कुलपती पदावर राज्यपालांऐवजी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली होती.