• Download App
    Amedia Company | The Focus India

    Amedia Company

    Anjali Damania, : पार्थ पवार काही कुकुले बाळ नाही, भूखंड घोटाळ्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडल्याने अंजली दमानिया संतापल्या

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित पुण्यातील कोरेगाव पार्क-मुंढवा येथील सुमारे 40 एकर जमीन विक्री प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात कंपनीच्या वतीने प्रमुख अधिकारपत्रधारक म्हणजेच कुलमुखत्यारधार म्हणून काम पाहणाऱ्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

    Read more

    Sheetal Tejwani : शीतल तेजवानीला अखेर अटक; मुंढवा येथील अमेडिया कंपनीच्या व्यवहाराप्रकरणी कारवाई

    पुण्यातील पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा कोट्यवधी रुपयांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल किसनचंद तेजवानी हिला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे नाव समोर आल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते. शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असतानाच तिला बेड्या ठोकल्याने तपासाला वेग येणार आहे..

    Read more

    Parth Pawar : अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ; जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरावे लागणार

    पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी आता पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे, अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे. अजित पवार यांनी या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर केला होता. मात्र, या व्यवहारासाठी पूर्वी आयटी पार्क उभारण्याच्या कारणावरून जी मुद्रांक शुल्क सवलत मिळाली होती, ती आता लागू होणार नाही, असं निबंधक कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

    Read more

    Parth Pawar, : पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा आणखी एक घोटाळा; पुण्यात जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार, 22 दस्त नोंदणीची चौकशी- मंत्री पाटील

    पार्थ पवारांनी घेतलेल्या जागेचीच नाही तर पुण्यातील अन्य २२ जमिनींच्या व्यवहारांच्या फायलींची तपासणी सुरू असून स्टॅम्प खरेदीही उघड होईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने पुण्यातील जमिनीचे मोठे घोटाळे समोर येण्याची चिन्हे आहेत. पार्थ पवारांच्या कंपनीला विकलेल्या जागेबरोबरच पुण्यातील बोपोडी येथील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याच्या प्रकरणाचाही त्यात समावेश आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग कार्यालयातील सहायकाच्या समितीकडून २२ भूखंडांवरील व्यवहाराची कसून तपासणी सुरू झाली आहे. पार्थ पवारांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती घेऊन निर्णय घेतील, चुकीचे असेल तर ते कुणालाही माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले.

    Read more