Ambadas Danve : निरोप समारंभावेळी अंबादास दानवे म्हणाले- मी पुन्हा येईन, चिंता करू नका! माझे काम सुरूच राहील!
शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यानिमित्ताने आज विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडला. निरोपाच्या भाषणावेळी त्यांनी संघातील सुरुवात, शिवसेनेतील वाटचाल आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले नातेसंबंध सांगत आठवणींना उजाळा दिला. तसेच “मी पुन्हा येईन” आणि ” मी मार खाऊन घरी परतरणारा नाही” असे म्हणत लढण्याचा निर्धारही व्यक्त केला.