Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा एक आठवडा आधीच बंद; मुसळधार पावसामुळे बालटाल व पहलगाम दोन्ही मार्ग खराब
अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे ३ ऑगस्ट रोजीच ती थांबवण्यात आली.काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी म्हणाले की, पावसामुळे यात्रा मार्गांचे बरेच नुकसान झाले आहे. बालटाल आणि पहलगाम दोन्ही मार्गांवर दुरुस्तीचे काम केले जाईल, त्यामुळे यात्रा थांबवावी लागली आहे. मार्गांवर सतत मशीन आणि कर्मचारी तैनात असल्याने यात्रा पुन्हा सुरू करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.