Kailash Hills : दिल्लीत आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी मुलीवर बलात्कार-खून; आरोपी डुप्लिकेट चावीने घरात घुसला होता
दिल्लीच्या पॉश भागातील कैलाश हिल्समध्ये बुधवारी सकाळी आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर मोबाईल फोन चार्जिंग केबलने गळा आवळून तिची हत्या केली.