Centre Intervenes : महाराष्ट्र-कर्नाटक पाणी वादात अखेर केंद्राचा हस्तक्षेप; अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा फेरविचार होणार, CM फडणवीसांनी दिले होते पत्र
कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेजच्या बांधकामात आणि प्रस्तावित उंची वाढीतील कथित अनियमिततेची केंद्राने अधिकृत चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्नाटकच्या एकतर्फी कृतींमुळे संभाव्य पूर धोका आणि पाणी व्यवस्थापन आव्हाने अधोरेखित केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.