Shinde : मित्रपक्षातून येणाऱ्यांना थांबवा; शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश, दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनंतर नवा पवित्रा
भाजप-शिंदेसेनेत पदाधिकारी फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. नाव न घेता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, गुरुवारी शिंदेंनी नवा पवित्रा घेतला. मित्रपक्षातून शिंदेसेनेत येणाऱ्यांना थांबवा, असे आदेश त्यांनी शिवसेना नेते, मंत्र्यांना दिले आहेत.