Allahabadia Samay Raina : मुंबईनंतर जयपूरमध्ये रणवीर इलाहाबादिया, समय रैना अन् इतरांविरुद्ध FIR दाखल
इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये अपशब्द वापरल्याबद्दल अडचणीत सापडलेला युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि इतरांच्या अडचणी वाढत आहेत. अश्लील विनोद प्रकरणात जयपूरमध्ये रणवीर इलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्व मखीजा आणि इतरांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.