Sanjay Raut : मतदार याद्यांमधील त्रुटींवर सर्वपक्षीय विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मुंबई मोर्चा, संजय राऊतांची घोषणा
राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. या गंभीर त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.