अरविंद केजरीवालांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी INDI आघाडी सोडल्याचे जाहीर करावे; काँग्रेस नेत्या अलका लांबांचे आव्हान!!
काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर छुपे वार करण्यापेक्षा अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये हिंमत असेल, तर त्यांनी काँग्रेस प्रणित INDI आघाडी सोडल्याचे जाहीर करून दाखवावे, असे आव्हान काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी केजरीवाल यांना दिले.