Trump : ट्रम्प म्हणाले-आंदोलन सुरू ठेवा, सरकारी इमारतींवर कब्जा करा, इराणचा आरोप- ट्रम्प-नेतन्याहू आमच्या लोकांचे मारेकरी
इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांचा आज 18वा दिवस आहे. यादरम्यान, इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी जनतेचे मुख्य मारेकरी म्हटले. X वर केलेल्या एका पोस्टमध्ये अली यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचेही नाव घेतले आणि त्यांना दुसरे मारेकरी म्हटले.