Chandrashekhar Bawankule : काँग्रेसची अवस्था चिंताजनक, पक्ष कोसळतोय; उबाठाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, जनता आमच्या मागे- चंद्रशेखर बावनकुळे
काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर या यातूनच अस्वस्थ होत बोलल्या असतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.