Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी तीन सपा आमदारांना पक्षातून काढले!
उत्तर प्रदेशच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाने त्यांच्या ३ आमदारांना पक्षातून काढून टाकले आहे. सपा अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसार पक्षाने ३ आमदारांना पक्षातून काढले आहे. समाजवादी पक्षाने सोशल मीडिया X वर ट्विट करून ही माहिती दिली आहे.