Akhand Bharat : नागपूरच्या झिरो माईल येथे ‘अखंड भारत एक्सपिरियन्स सेंटर’सह अनेक प्रकल्पांना मंजुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नागपूर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा’शी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत बैठक पार पडली. यावेळी नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकल्पांना तत्वतः मंजुरी देण्यात आली.