Ajit Pawar : परभणीत पवारांना मोठा धक्का; माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अजित पवार यांना साथ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच, अजित पवार गटाने शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना परभणीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. परभणीतील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.