पुण्यात अजितदादांना limited options, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटल्या तव्यावर; भाजपला walk over!!
पुण्यामध्ये अजितदादांना लिमिटेड ऑप्शन्स, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटून टाकल्या तव्यावर!! अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अवस्था झाली. जमीन खरेदी व्यवहारात महाराष्ट्र सरकारला फसवण्याच्या मुद्द्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर अजित पवारांना संपूर्णपणे शहरासाठी एक शहराध्यक्ष सापडला नाही. त्यामुळे अजितदादांनी पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमून पक्षांतर्गत अधिकाराची विभागणी केली.