Ram Shinde : अजित पवार ‘ते’ वक्तव्य करून मला टॉर्चर करत आहेत; विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला.