• Download App
    Ajit Pawar Plane Crash Investigation 2026 | The Focus India

    Ajit Pawar Plane Crash Investigation 2026

    Supriya Sule : रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी

    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडूनही काही शंका व्यक्त करण्यात आल्या.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले- दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते; नरेश अरोरांच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल दादांची भूमिका वेगळी होती

    नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवा, अशी काहींची भूमिका होती. मात्र, अजित दादांची कॉन्ट्रॅक्ट संदर्भात वेगळी भूमिका होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मी कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. तटकरे आरोरांच्या कॉन्ट्रॅक्ट साठी चर्चेला गेल्याचा अंदाज असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र या सर्व गोष्टींची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. दादांना का उशीर झाला? हे मी बोलून दाखवले, दादा गाडीने गेले असते तरी दुर्घटना घडली नसती, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले- विमानात काय घडले 9 तारखेनंतर सांगणार; विलीनीकरणाबाबत कुटुंबात कोणतीही चर्चा झालेली नाही

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, आता या अपघाताबाबत नवनवीन माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “विमानात नक्की काय घडलं? कशा प्रकारे ही दुर्घटना झाली? याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून, ९ फेब्रुवारीनंतर मी यावर स्पष्टपणे भाष्य करणार आहे,” असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पवार कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

    Read more