Pakistan : पाकिस्तानने म्हटले- भारताने 6 लढाऊ विमाने गमावल्याचे सत्य स्वीकारावे; डोभाल यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर
शुक्रवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा ६ भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला. पाकिस्तानी माध्यम डॉननुसार, परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी पत्रकार परिषदेत भारताला लढाऊ विमाने गमावल्याची वस्तुस्थिती स्वीकारण्यास सांगितले.