‘Ajey’ film : योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय’ चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीअभावी अडकला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत असून, प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्याच्या प्रदर्शनावर अडथळा निर्माण झाला आहे.