• Download App
    airstrike | The Focus India

    airstrike

    Pakistan : पाकिस्तानकडून आपल्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला; 30 ठार, अनेक घरे उद्ध्वस्त

    पाकिस्तानी हवाई दलाने रविवारी रात्री उशिरा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर हवाई हल्ला केला. चिनी बनावटीच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांनी रात्री २ वाजता आठ लेसर-गाइडेड एलएस-६ बॉम्ब टाकले, ज्यामध्ये महिला आणि मुलांसह ३० हून अधिक नागरिक ठार झाले. अनेक गंभीर जखमी झाले आणि गावातील घरे उद्ध्वस्त झाली. लष्कराचा दावा आहे की या हल्ल्यात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या बॉम्ब-निर्मिती कारखान्याला लक्ष्य करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अमन गुल आणि मसूद खान हे दोन स्थानिक कमांडर गावात स्फोटके साठवत होते.

    Read more

    Israel : इस्रायलचा कतारची राजधानी दोहावर हल्ला; हमास नेता थोडक्यात बचावला, इतर 6 जणांचा मृत्यू

    मंगळवारी कतारची राजधानी दोहामध्ये अनेक मोठे स्फोट ऐकू आले. इस्रायली सैन्याने हमासच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करून हवाई हल्ले केल्याची घोषणा केली.हा हल्ला हमास प्रमुख खलील अल-हय्या यांना लक्ष्य करून करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल-हय्या या हल्ल्यात बचावले, तर इतर ६ जणांचा मृत्यू झाला.

    Read more

    Israeli : इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी बंडखोरांचे पंतप्रधान ठार; संरक्षणमंत्र्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता

    येमेनची राजधानी सना येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हुथी बंडखोरांचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यांमध्ये हुथी संरक्षण मंत्री मोहम्मद अल-अती आणि चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद अब्द अल-करीम अल-घमारी यांनाही लक्ष्य करण्यात आले होते, ज्यांचा मृत्यु झाल्याची भीती आहे.

    Read more

    Nigeria : नायजेरियात चुकून सर्वसामान्यांवर हवाई हल्ला; 16 जणांचा मृत्यू, पायलटचा स्थानिकांना गुन्हेगारी टोळी समजून गोळीबार

    वृत्तसंस्था नायजर : Nigeria आफ्रिकन देश नायजेरियाच्या उत्तर-पश्चिमी राज्य झम्फारा येथे रविवारी लष्करी हवाई हल्ल्यात 16 जण ठार झाले. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, एका पायलटने चुकून […]

    Read more

    Yahya Sinwar : हमास प्रमुख याह्या सिनवार इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार!

    इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली पुष्टी ; हमासकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. विशेष प्रतिनिधी जेरुसलेम: Yahya Sinwar इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यात गेल्या वर्षभरापासून युद्ध सुरू […]

    Read more