Safely Return : 52,000 हून अधिक भारतीय आखाती देशांतून परतले; 32,107 भारतीय एअरलाईन्स, उर्वरित परदेशी व्यावसायिक विमानांनी परत आले
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शनिवारी पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील परिस्थितीबद्दल माहिती देताना सांगितले की, 1 ते 7 मार्च 2026 दरम्यान 52,000 हून अधिक भारतीय सुरक्षितपणे आखाती देशांतून भारतात परतले. यापैकी 32,107 भारतीय एअरलाईन्सद्वारे, तर उर्वरित लोक परदेशी व्यावसायिक विमानांनी आणि नॉन-शेड्यूल्ड विमानांनी परत आले आहेत.