Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय
पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कराने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. लष्कराकडून DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई, नौदलाकडून व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि हवाई दलाकडून एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी पुन्हा ३२ मिनिटे ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल माहिती दिली.