Air India flight : न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी
मुंबईहून न्यू यॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर परत मुंबईत आणण्यात आले. या संदर्भात अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. विमानात ३२० हून अधिक लोक होते आणि ते मुंबईत सुरक्षितपणे उतरले. सुरक्षा यंत्रणा याचा तपास करत आहेत.