Air Force : हवाई दल आणि लष्कर प्रमुखांचे तेजसमध्ये उड्डाण; पहिल्यांदाच 2 लष्करप्रमुख एकाच लढाऊ विमानात एकत्र
रविवारी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एलएसी येथे तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले. बंगळुरूमध्ये एअरो इंडिया-२०२५ सुरू होण्याच्या एक दिवस आधी दोन्ही लष्कर प्रमुख तेजस लढाऊ विमानात बसले. एअरो इंडिया-२०२५ कार्यक्रम १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान चालेल.