Zelenskyy : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची ट्रम्प यांच्याशी चर्चा; गाझा शांतता योजनेबद्दल केले अभिनंदन
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की, जर एक युद्ध रोखता आले तर रशिया-युक्रेन युद्ध देखील रोखता येऊ शकते.