Air India : एअर इंडियाच्या विमानात तासभर एसीशिवाय बसून राहिले प्रवासी; दिल्ली विमानतळावर गोंधळ; इंदूरसाठी 3 तास उशिरा उड्डाण
दिल्लीहून इंदूरला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2515 विमानाला तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरून परत टर्मिनलवर आणावे लागले. धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात एअर कंडीशनिंग (AC) बंद करण्यात आले. प्रचंड उष्णता आणि बंद केबिनमध्ये तासभर अडकल्याने प्रवाशांची तब्येत बिघडायला लागली.