Imtiaz Jaleel : सहर शेखचे विधान पक्षाचीच अधिकृत भूमिका, नगरसेविकेचे इम्तियाज जलीलांकडून समर्थन, म्हणाले- पूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’ करणार
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमच्या (AIMIM) नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला राजकीय गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता या वादात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली असून, त्यांनी सहर शेख यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. “सहर शेख यांचे विधान हे केवळ त्यांचे वैयक्तिक मत नसून ती पक्षाचीच अधिकृत भूमिका आहे,” असे म्हणत जलील यांनी येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’ करणार,” असे ते म्हणाले.