Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघातात प्रकरणी एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन
अहमदाबाद विमान अपघातासाठी एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला त्यांच्या तीन अधिकाऱ्यांना सर्व पदांवरून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. फ्लाइट क्रू शेड्यूलंगशी संबंधित ‘गंभीर आणि वारंवार उल्लंघन’ केल्यामुळे DGCA ने एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे.