Syria : 58 वर्षांनंतर सीरिया संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होणार; राष्ट्राध्यक्ष अल-शारा न्यूयॉर्कमध्ये पोहोचले
५८ वर्षांत पहिल्यांदाच सीरिया संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) सहभागी होणार आहे. २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या ८० व्या महासभेत सहभागी होण्यासाठी सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शारा रविवारी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले.