Ahilyanagar : अहिल्यानगरात कारच्या धडकेत हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू; आमदार धस यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक बसून, दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सोमवारी (७ जुलै) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन प्रकाश शेळके (३४, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात आमदार धस यांचा मुलगा सागर धसविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.