Karuna Sharma : धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यापूर्वी आम्हाला विष द्या; करुणा शर्मा यांची अजित पवारांकडे मागणी
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. धनंजय यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा मुंडे यांनी याला कडाडून विरोध केला आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्यापूर्वी आम्हाला विष द्यावे, असे त्या म्हणाल्यात.