Maharashtra Government : शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपये अनुदान; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती
शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या संदर्भात माहिती देताना भरणे म्हणाले, जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषि विभागामार्फत आयोजन केले जाते, अशी माहिती भरणे यांनी दिली आहे.