Agriculture Minister Kokate : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या टिप्पणीवर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली माफी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जमाफीच्या संदर्भात बोलताना शेतकऱ्यांनाच खडे बोल सुनावले होते. त्यांनी कर्जमाफीच्या पैशांचे तुम्ही काय करता? असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचा हिशोब विचारला होता. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी आपल्या त्या विधानावरून माफी मागितली. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.