Jain Munis : जैन मुनींची आक्रमक भूमिका- मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास नाही, सोमवारी संपूर्ण देशात मूक मोर्चा
पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले असून, यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मोहोळ यांनी नुकतीच जैनमुनींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी, ‘माझा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही आणि मी हे पुराव्यानिशी वारंवार स्पष्ट केले आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, हा प्रश्न काही दिवसांत संपेल,’ असे आश्वासन दिले होते. मात्र, मोहोळ यांच्या या विधानानंतर आता जैनमुनींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.