Florida Test : जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ला मोठा धक्का; फ्लोरिडात चाचणीदरम्यान ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचा भीषण स्फोट
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिनला मोठा धक्का बसला आहे. कंपनीचे महत्त्वाकांक्षी ‘न्यू ग्लेन’ हे विशाल रॉकेट फ्लोरिडातील केप कॅनव्हेरल प्रक्षेपण केंद्रावर चाचणीदरम्यान भीषण स्फोटात उद्ध्वस्त झाले. या घटनेमुळे अमेरिकेच्या चंद्र मोहिमांनाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.