निवडणुका जिंकणे युती किंवा आघाडीवर अवलंबून नाही; ते कार्यकर्त्यांच्या बळावर अवलंबून; प्रकाश आंबेडकरांचा वंचितला मंत्र
महापालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी युती झाली किंवा नाही झाली, तरी स्वतःची हिंमत हरता कामा नये. अनेकांचे सूर निघतात युती झाली नाही, तर आता काय करायचे?? असे म्हणणारे लोकं हे निवडणुकीच्या काळात निराश करण्याचे काम करतात. युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो, ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केले.