Bihar Voter List : एडीआर, राजदसह इतरांच्या याचिका; बिहार व्होटर लिस्टप्रकरणी सुप्रीम कोर्टात 10 रोजी सुनावणी
बिहारमधील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १० जुलै रोजी सुनावणी करणार आहे. आयोगाच्या निर्णयाला एडीआर, पीयूसीएल, आरजेडी आणि काँग्रेससह इतर याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले आहे. सोमवारी, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण उपस्थित करून सुनावणीची विनंती केली.