ADR Report : एडीआर रिपोर्ट : 143 महिला खासदार आणि आमदारांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 78 जणांवर गंभीर आरोप
निवडणूक सुधारणांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) महिला खासदार आणि आमदारांवरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील एकूण ५१२ महिला खासदार आणि आमदारांपैकी २८% म्हणजेच १४३ जणांवर फौजदारी खटले दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी ७८ (१५%) महिला खासदारांवर खून, अपहरण असे गंभीर आरोप आहेत.