Nitin Gadkari : नितीन गडकरींचे प्रशासकीय कार्यपद्धतीवर बोट- वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले की, आपणही तेच म्हणायचे
वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटले की, आपणही त्याला घोडाच म्हणायचे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सरकार व प्रशासकीय कार्यपद्धतीवर खंत व्यक्त केली. सरकारमध्ये काम करताना जे वरिष्ठ सांगतात तेच करायचे असते. अधिकाऱ्यांवर नेत्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्याचा दबाव असतो, असेही ते यावेळी म्हणाले.