राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणी; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; आदित्य प्रतिष्ठानचा कृतज्ञता पुरस्कार प्रदान
विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.