• Download App
    Aditi Tatkare | The Focus India

    Aditi Tatkare

    Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींवरून विधानसभेत विवाद; विरोधकांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांचा बहिणींच्या नादी न लागण्याचा इशारा

    राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा विधिमंडळात गाजली. आज (बुधवार, १० डिसेंबर) हिवाळी अधिवेशनादरम्यान या योजनेतील कथित घोटाळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी केवायसी प्रक्रिया आणि बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदिती तटकरे आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत विरोधकांवर जोरदार पलटवार केला.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात भीक मागण्यावर बंदी येणार विधानसभेनंतर विधान परिषदेतही विधेयक मंजूर; मंजूरीवेळी गोंधळ

    राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे बहुचर्चित विधेयक मंगळवारी विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मंजूर करण्यात आले. मात्र, हे विधेयक मंजूर होताना सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. विधेयकातील त्रुटी, शीर्षकातील संदिग्धता आणि प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर खुद्द तालिका सभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्याने पाठवलेले ‘शक्ती विधेयक’ केंद्र सरकारने नाकारल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

    Read more

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    सरकारी नोकरीत असूनही ९५२६ महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेत नाव नोंदणी केली आणि वर्षभरात सुमारे १४ कोटी ५० लाख रुपये लाटले, अशी माहिती हिवाळी अधिवेशनात समोर आली. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत उपस्थित तारांकित प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की, १४,२९८ पुरुषांनीही बनावट कागदपत्रे सादर करून २१ कोटी ४४ लाख रुपये गिळंकृत केले आहेत.

    Read more

    Aditi Tatkare : मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या- लाडकी बहीण योजनेतील केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर, परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्याचा निर्णय

    राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेकांकडून केवायसीची मुदतवाढ मागणी होत आहे.

    Read more

    Aditi Tatkare गरजू महिलांचे नाव लाडकी बहिण योजनेतून वगळणार नाही, आदिती तटकरे यांची ग्वाही

    कुठल्याही गरजू महिलेचे नाव लाडकी बहिण योजनेतून कमी केलेले नाही.योजनेसाठी जी महिला पात्र आहे तिला आम्ही लाभापासून कधीच वंचित ठेवणार नसल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

    Read more

    Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थी वगळले; अदिती तटकरे यांची माहिती

    महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली

    Read more

    Aditi Tatkare : रायगडच्या पालकमंत्री पदावर अदिती तटकरेंची निवड; मंत्री भरत गोगावलेंचे समर्थक आक्रमक, 32 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

    राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली. त्यानंतर अनेकांना पालकमंत्री पद मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांना न मिळाल्याने नाराजीचे सुर उमटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रायगडचा पालकमंत्री म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नेते व रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची निवड होणार अशी चर्चा होती, पण त्यांना वगळण्यात आले आहे

    Read more

    Aditi Tatkare : अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, कार असणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार; मंत्री अदिती तटकरेंची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई :Aditi Tatkare  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र अर्जांची पडताळणी केली जाईल. त्यात कुटुंबाचे अडीच […]

    Read more

    Aditi Tatkare : लाडकी बहिण योजनेबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर अदिती तटकरे यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Aditi Tatkare  महाराष्ट्रातील लोकप्रिय ‘लाडकी बहिण योजना’ बद्दल सध्या काही अफवांचा बाजार गाजत असा आरोप माजी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती […]

    Read more

    रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीनही आमदार राष्ट्रवादी विरोधात आक्रमक; पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटवण्याची मागणी!!

    प्रतिनिधी अलिबाग : महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबरोबर तडजोड करून महाविकास आघाडीची सत्ता चालवली असली तरी रायगड जिल्ह्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more