Adani Group : अदानी ग्रुप मध्य प्रदेशात ₹2.10 लाख कोटी गुंतवणार; 2030 पर्यंत 1.2 लाख रोजगार निर्मिती
अदानी ग्रुप मध्य प्रदेशात २.१० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भोपाळ येथे होत असलेल्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी याची घोषणा केली आहे. समूह कंपन्या खाणकाम, स्मार्ट वाहने आणि औष्णिक ऊर्जा क्षेत्रात १.१० लाख कोटी रुपये गुंतवणूक करतील.