Nithari : निठारी हत्याकांडातील मुख्य दोषी सुरेंद्र कोलीची सुटका होणार; सुप्रीम कोर्टाने शेवटच्या प्रकरणातही निर्दोष सोडले
२००५-२००६ मध्ये नोएडा येथील निठारी हत्याकांडाशी संबंधित खून आणि बलात्काराच्या आरोपातून सुरेंद्र कोलीची सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने सुरेंद्रने त्याच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका मंजूर केली.