Abu Azmis : ”माझे निलंबन मागे घेण्याची मी विनंती करतो” ; अबू आझमींचे विधानसभा अध्यक्षांना पत्र!
समाजवादी पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. अबू आझमींनी औरंगजेबाची स्तुती केली होती. यानंतर ते वादात सापडले आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले. आता त्यांनी सभापतींना पत्र लिहून त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याची मागणी केली आहे.