Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या एक्स खात्यावरील बंदीवरून दिल्ली हायकोर्टात सुनावणी; केंद्र सरकार आणि एक्सला नोटीस
दिल्ली उच्च न्यायालयाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) या व्यंगात्मक डिजिटल गटाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर घालण्यात आलेल्या बंदीप्रकरणी केंद्र सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला नोटीस बजावली आहे. मात्र, न्यायालयाने तत्काळ खाते पुन्हा सुरू करण्यास नकार दिला.